सोलापूर : एमआयडीसीतील संगमेश्वर नगर येथील गल्लीत राहणाऱ्या शहाजरीन विजापुरे, खैरून विजापुरे यांनी पोलिसात दिलेली फिर्याद माघारी घेण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार आरजू बागवान यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली आहे. खैरून विजापुरे हिने गल्लीमधील रस्त्यावर पडलेला सिमेंट काँक्रीटचा दगड उचलून मारल्याने कपाळावर दुखापत झाल्याचे आरजू बागवान हिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मुद्दे अधिक तपास करीत आहेत.