एक ठार, एक जण गंभीर जखमी…
सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एस.आर.पी.एफ जवानांनी गोळीबार केल्याची घटना बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली आहे. या घटनेत १ जण जागीच ठार झाला असून १ जणाला पिस्टलची गोळी लागून गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या घटनेनंतर दोघांवर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद वैराग पोलिसात दाखल झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यामध्ये नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमी महात्मे यांच्यावर सोलापूरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत SRPF चे जवान गोरोबा तुकाराम महात्मे यांच्यावर काशिनाथ विश्वनाथ काळे यांनी दिलेल्या फिर्यादिवरून वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की या घटनेप्रसंगी पिस्टल मधून चार फायर झाले तर पोलिसांनी सरकारी पिस्टल व २६ जिवंत काडतूसे जप्त केली असून वैराग पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काल अटक केली आहे. भा.द.वि. कलम 302,307,504, शस्त्र अधिनियम 0,3,25 27,प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास वैराग पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनय बहिर हे करत आहेत.