सोलापूर – राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत शहर व ग्रामीण तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण येथील विविध विभागातील कार्यरत असणारे वैदयकीय अधिकारी व कर्मचारी यांचे राज्यस्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे या आंदोलनास आज महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. सोलापूर शहर व ग्रामीण सर्व जिल्हास्तरीय प्रा. आ. केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय येथील “राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण सर्व अधिकारी कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत.आज संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव व अध्यक्ष सचिन जाधव , शंकर बंडगर , सचिन सोनवणे, प्रशांत दबडे, जिल्हाध्यक्षा यशवंती धत्तुरे , दिपाली व्हटे , अर्चना कणकी , आनंद मोची , मुकूंद आकुडे , महादेव शिंदे यांनी भेटून पाठींबा दिला.
राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण अधिकारी कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षापासून तुटपुंजा मानधनावर काम करत असून कोरोना काळात याच कर्मचा-यांनी घरदार जीवाची परवा न करता आपले कर्तव्ये चोखपणे बजावले आहे. शासन सेवा समायोजन करावे अशी त्याची मागणी असून मुंबई येथील आझाद मैदानावर पार पडलेल्या आक्रोश मोर्चामध्ये आरोग्य मंत्र्यानी दिलेले आश्वासन लेखी स्वरुपात प्राप्त होत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचे पावित्रा त्यांनी घेतला आहे. ज्याप्रमाणे इतर राज्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कंत्राटी कर्मचा-यांचे समायोजन केली आहे. त्याच पध्दतीने राज्य शासनाने देखिल लवकरात लवकर समायोजन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. या कामबंद आंदोलनाचा फटका रुग्णसेवेवर होत आहे.
सेवेत कायम करा – प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव
कोरोना काळात कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले आहे. ५० टक्के जागावर कंत्राटी कर्मचारी यांचे समायोजन करा. असे ठाम मत प्रदेशाध्यक्ष सच्न जाधव यांनी केले. पुनम गेटवर आंदोलकांसमोर ते बोलत होते. शासनाने संबंधीत आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत विविध विभागातील तसेच क्षयरोग विभाग शहर व ग्रामीण कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासन सेवेत लवकरात लवकर सामावून घ्यावे. ज्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला बळ मिळेल.