सोलापूर:-ख्यातनाम सुंद्रीवादक कै.सिद्राम जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सोलापूर येथे आयोजित केलेल्या २६ व्या संगीत महोत्सवामध्ये सुंद्री गायन सतार पखवाज वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुरुवातीला आयोजक सुंद्रीवादक पं. भिमण्णा जाधव, उस्ताद रईस खान, ज्ञानेश्वर दुधाणे, सिध्दाराम पाटील,गोवर्धन कमटम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.


त्यानंतर पं. भिमण्णा जाधव यांच्या शिष्य मास्टर व्यकटेशकुमार जाधव कलाश्री ,जाधव शकुंतला ,जाधव मयुरेश, जाधव सिद्राम, जाधव सरस्वती ,जाधव सुंदर सुंद्री वादन झाले राग यमन सादर केला त्यांना तबला साथ नितीन दिवाकर यांनी केली.नंतर सानिका कुलकर्णी आणि रसिका कुलकर्णी यांचे सुंदर गायन झाले. राग मारुबिहाग व रागमाला सादर केला त्यांना दादा मुळे यांनी तबला साथ केली.त्यानंतर पखवाज वादनाला सुरुवात करत ज्ञानेश्वर दुधाणे यांनी आदीताल सादर करत उठान. चक्रदार. रेले, परण सादर केलें त्यांना लेहरासाथ वैभव केंगार यांनी केली. संगीत महोत्सवाची सांगता ख्यतनाम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक उस्ताद रईस खान यांच्या सतारवादनाने झाली आलाप जोड झाला अतिशय तयारीने वाजवलेल्या सतार वादननाने सोलापूरकर कलाशिक मंत्रमुग्ध झाले त्यांनी राग किरवाणी सादर केल्यानंतर पहाडी धून वाजवली त्यांना तितकीच सुंदर तबला साथ ऋषिकेश बदामीकर यांनी दिली

याचबरोबर पंडीत भिमण्णा जाधव सुंद्री सारख्या दुर्मिळ व सुषीर वाद्याचा अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचारासाठी करण्यासाठी अतिशय सिंहाचा वाटा असून अनेक दिग्गज कलाकारांना सोलापूर येथे आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करत उदयोन्मुख कलाकारांना ही संधी प्राप्त करून देतात.तसेच पंडीत चिदानंद जाधव यांच्या समरणार्थ संगीत प्रतिभा महोत्सव ही सोलापूर येथे दुर्लभ सुंद्रीवाद्या कला अकादमी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या आयोजित करत आहेत. देश विदेशात अनेक ठिकाणी स्वतंत्र पणे सुंद्री वादन कार्यक्रम झालेले आहेत व अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन पं.भिमाण्णा जाधव करीत असून यशस्वी करण्यासाठी गायत्री जाधव.कलाश्री जाधव.गोरखनाथ जाधव.डॉ.जगदीश पाटील.श्रृती मैंदर्गीकर.निलम शहाणे.त्याचा शिष्य परिवाराने अधिक परिश्रम घेतले