येस न्युज मराठी नेटवर्क : योग साधना मंडळातर्फे शुक्रवारी रथसप्तमी निमित्त सांघिक आणि वैयक्तिक सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. सेवासदन मुलींच्या प्रशालेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे प्रांतपाल जयेश भाई पटेल होते. योगसाधना मंडळाचे अध्यक्ष बाबुशेठ सोनी यांनी पटेल यांचे स्वागत केले. गोपाळदादा पत्की यांनी जवळपास चाळीस वर्षापूर्वी योग साधना वर्ग सेवासदन प्रशालेत सुरू केल्याचे सांगण्यात आले . सध्या या वर्गात पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. सूर्यनमस्कार हे अत्यंत सोपे आणि परिणामकारक अंग असल्याचे स्पष्ट करण्यात आले . सूर्य ही आरोग्याची देवता असून शरीर हे मुक्तीचे साधन आहे आणि रोगी शरीरातून मुक्ती मिळत नाही. म्हणूनच श्री कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ‘युक्त आहार विहारस्य ‘याप्रमाणे दररोज सूर्यनमस्कार घातलेच पाहिजेत , असे प्रतिपादन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले . या प्रणव मंत्रांमुळे शरीरातील दूषित द्रव्य बाहेर पडून शरीराचा रक्तदाब सुधारतो व रक्ताभिसरण योग्य होते असेही सांगण्यात आले.