मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे.
सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता नितीन करीर यांच्याकडून मुख्य सचिवपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक हे एप्रिल ३० एप्रिल २०२३ रोजी राज्याचे मुख्य सचिव बनले होते. डिसेंबर २०२३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पतीनंतर पत्नी राज्याची मुख्य सचिव झालेले हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.