सोलापूर- ज्ञान- ध्येयाची सप्तरंगी कमान म्हणजे यश हे यश उच्च पदस्थ होऊन देश, गुरू, आणि माता पित्यांची समर्पित सेवा केल्यास त्यास पावित्र्य आणि पूर्णत्व येते असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि आणि एम आय टी ज्युनिअर कॉलेज केगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10 (सी बी एस सी) आणि 12 वी च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मेसानिक हॉल येथे आयोजीत केला होता. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा,सेक्रेटरी स्वप्नील कोंडगुळे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्राप्त रोटे सुनील दावडा यांचा ही त्यांनी आपल्या भाषणात गौरवपूर्ण उल्लेख केला.
तसेच एम आय टी चे प्राचार्य स्वप्नील शेठ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि रोटरी नॉर्थ च्या समाज उपयोगी कार्याचे या प्रसंगी कौतुक केले. प्रारंभी राष्ट्रगीताने कार्यकर्माची सुरुवात करण्यात आली. दोन्ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय सचिन भट्टड यांनी करून दिला तर स्वागत अध्यक्षा डॉक्टर जानवी माखिजा यांनी गुच्छ देऊन केले.या कार्यक्रमास सुनील दावडा, राजगोपाल झंवर, हिरालाल डागा, बाळासाहेब शितोळे, पवन अगरवाल, दीपक आर्वे, देविदास मेढे, दौलत सीताफळे, आसावरी सराफ, यशाया शिरशेट्टी,
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले तर आभार सुनील दावडा यांनी मानले.