No Result
View All Result
- सोलापूर – सुबोध अशोक भैसारे हे दिवाणी न्यायाधीश ( क.स्तर) व न्यायदंडाधिकारी ( प्र.वर्ग ) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी सोलापूर येथील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेन्टमध्ये दहावी तर चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी केली. त्यानी त्यांची कायद्याची पदवी पुणे येथील आय.एल.एस. महाविद्यालय येथे पूर्ण केली. त्यानंतर त्यानी पुढील वाटचालीसाठी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे एल. एल.एम.पूर्ण केले. मागील कोरोना काळात त्यांनी कायदा शाखेतून दोन्ही सेट आणि नेट परीक्षा सुद्धा पास केल्या. सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश ( क.स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्र.वर्ग) परीक्षेचा निकाल नुकताच एम. पी. एस .सी ने जाहीर केला. त्यात सुबोध अशोक भैसारे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने उतीर्न होऊन न्यायाधीश पदी नियुक्ती झाली.
- त्यांचे वडील जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावरून सेवा निवृत्त झाले व ते सध्या सोलापूर येथे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांची आई गृहिणी आहेत. त्यांचे थोरले बंधू यांची सन २०२१ मध्ये आय. ए. एस.पदावर नियुक्ती झाली आहे . सुबोध यांच्या यशाबद्दल त्यांचे आई, वडील,भाऊबहिण , नातेवाईक ,मित्र परिवार यांचे कडून अभिनंदन करण्यात आले आहे व समाजाच्या सर्व स्तरातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
No Result
View All Result