• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर – आ. सुभाष देशमुख

by Yes News Marathi
April 5, 2021
in इतर घडामोडी
0
मोहोळ ते तांदुळवाडी महामार्गाला पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर – आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महामार्गाच्या व्हिजनमधून सोलापूर जिल्ह्याला झुकते माप मिळाले आहे. जिल्ह्यातील एकूण सहा महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली असून यात आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मोहोळ ते  तांदुळवाडी या महामार्गाला  पहिल्या टप्प्यात 54 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. निधी दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.

  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी रविवारी राज्यातील 829 कि.मी.च्या तब्बल 54 प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यासाठी तब्बल 4 हजार 590 कोटी रूपये दिले. यात सोलापूर जिल्ह्यातील सहा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये आ. सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केलेल्या मोहोळ- कुरूल- कामती- कंदलगा- – मंद्रूप- बसवनगर- तेरामैल – कणबस -आचेगाव-कणबस-धोत्री- तांदुळवाडी या  महामार्गाचाही समावेश आहे.  या महामार्गासाठी आ. देशमुख हे गडकरी यांच्याकडे 2015 पासून पाठपुरावा करत होते. अखेर आज त्याला पहिल्या टप्प्यात 54 कोटी 7 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या प्रकल्पामुळे  दळणवळणाच्या सुविधा वाढणार आहेत. हा प्रकल्प मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. देशमुख यांनी  ना. गडकरी यांचे आभार मानले आहेत.

 सर्व गावांचा चेहरा बदलणार
 नितीन गडकरी यांच्या कामाचे संपूर्ण देशातून कौतूक होत आहे. त्यांच्याकाळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार कामे होत आहेत. मोहोळ ते  तांदुळवाडी महामार्गाला 54 कोटींचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. या रस्त्यांमुळे या सर्व गावांचा चेहरा बदलणार आहे, असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदच्या वतीने अधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post

सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….

Next Post
सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये….

सोलपूरकरांचा प्रवास आता इलेक्ट्रिक बसमध्ये....

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group