सोलापूर –महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील एक कोटी लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी महात्मा बसवण्णा यांचे विचारांची लिंगायत जोडो बसवज्योत रथयात्रा मंगळवेढा ते मुंबई प. पुज्य चन्नबसवानंद महास्वामीजी व राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक प्रदिप बापू वाले(सांगली) व जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे (सोलापूर) नेतृत्वाखाली निघणार आहे असल्याची माहिती प्रदीप वाले यांनी दिली.
महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी बसवज्योत रथ यात्रा असून लिंगायत समाज ठरवणार सत्ता कोणाची असावी. ६० मतदारसंघात आपण निर्णायक आहोत. या यात्रेत महाराष्ट्रातील विविध संघटना व बसवप्रेमीचा सहभाग असणार असे महाराष्ट्र
समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी सांगितले.
लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे
१) लिंगायत धर्माला संविधानीक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा.
२) महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णा यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणी करावे.
३) लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत दाखल्यासहीत सर्व पोटजातींना ओबीसी चे आरक्षण देण्यात यावे.
४) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला ५ हजार कोटी निधी मिळावा.सरसकट लिंगायत समाजाला लाभ मिळावा.
५) लिंगायत समाजाला महाराष्ट्रामध्ये भाषिक अल्पसंख्यांक व केंद्रामधे अल्पसंख्यांक दर्जा द्यावा.
६) महात्मा बसवण्णा यांचे वचन साहीत्य शैक्षणीक अभ्यासक्रमात घ्यावे.
७) लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व नोकरी मध्ये प्राधान्य द्यावे.प्रत्येक जिल्हयात राहण्यासाठी वसुतीगृह पाहिजे.
८) लिंगायत समाजाला जनगणना मध्ये वेगळा कॉलम द्यावा.
९) लिंगायत समाजातील शरण स्थळांना व मठांना तिर्थ क्षेत्राचा अ वर्ग दर्जा देण्यात यावा.
१०) गाव तिथे स्मशानभुमी (रुद्रभूमी )साठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.
११) दिल्ली येथील नविन संसद भवनास महात्मा बसवण्णा यांचे नाव द्यावे.
लिंगायत जोडो बसव यात्रा 22 ऑक्टोबर सुरुवात
मंगळवेढा – सोलापूर – अक्कलकोट – मुक्काम १ – मुरूम – उमरगा – लातूर – अहमदपूर मुक्काम २ – लोहा -नांदेड -गंगाखेड – परळी वैजनाथ -अंबेजोगाई – कपिलधारा ३ – धाराशिव – बार्शी – पंढरपूर ४ – सांगोला – जत – गुड्डापूर – डफळापूर – कवठे महांकाळ ५ – मिरज – जयसिंगपूर – अल्लमप्रभु -कोल्हापूर – जोतिबा – वारणानगर ६- कराड – सातारा -कोरेगाव – शिगंणापूर शिखर – फलटण ७ – जेजुरी खंडोबा – सासवड – पुणे – निगडी ८ – कार्ला – लोणावळा – कर्जत – अंबरनाथ ९ – कल्याण – ठाणे – आझाद मैदान मुक्काम १०- मुंबई मंत्रालय ११ समारोप.या पत्रकार परिषेदत मल्लिकार्जुन मुलगे,चन्नवीर भद्रेश्वरमठ, तुकाराम माळी,अशोक भांजे, नामदेव फुलारी,राजशेखर कापसे,सकलेश बाभूळगावकर, विजयकुमार कुलकर्णी,नागेश पडणुरे आदी उपस्थितीत होते.