सोलापूर – कर्मचारी यांनी स्वत च्या कामाचे मुल्यमापन करावे. लोकांना द्यावयाच्या सेवेत कमतरता ठेऊ नका. सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले दशसुत्री उपक्रम, सायकल बॅंक व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेणेत आली आहे. राज्याच्या समितीसमोर हे नाविण्य पुर्ण उपक्रम मांडणार असल्याचे राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांडरे यांनी आज सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज त्यांनी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन सुचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. कोईनकर, शिक्षण उप निरिक्षक धनाजी बुटे, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय जावीर, शिक्षणधिकारी माध्यमिक सुलभा वठारे, डाएट चे प्राचार्य रामचंद्र कोरडे आदी प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परिषदेने विविघ शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत असे सांगून आयुक्त सुरज मांडरे म्हणाले, या उपक्रमाचे सातत्य राखणे सर्वांची जबाबदारी आहे. दशसुत्री उपक्रमांत सर्व शैक्षणिक विभागाचे सार आहे. स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम राज्यास दिशा देणारा आहे. राज्याच्या शैक्षणिक समिती समोर हे उपक्रम ठेवणार आहे. मुलांची आरोग्य तपासणी, सायकल बॅंक सारखे उपक्रम महत्वपुर्ण आहेत. या उपक्रमाचे सातत्य टिकवून ठेवा. अधिकारी येतात जातात परंतू हे उपक्रमामुळे संस्थेचे नाव होते.
“ राईट टी सर्व्हीस” चांगले काम करा. ८० टक्के चांगले काम करतो परंतू २० टक्के खराब कामामुळे चांगले काम केलेले बदनाम होते.
बेजबाबदार लोकांवर कारवाई करणे साठी मागे पुढे पाहणार नाही असे त्यांनी स्पष्ट पणे सांगून प्रत्येक सिईओ शिक्षण विभागासाठी चांगले काम करतो. वरिष्ठ पातळीवरील अधिकारी हे सिईओ म्हणून या पुर्वी कुठे ना कुठे काम केलेले असतात त्यावेळेस राज्य स्तरावर शिक्षण विभागाते उपक्रमाची नेहमी चर्चा होते. याबाबत आपण कटाक्षाने काम करा असे आवाहन आयुक्त मांडरे यांनी केले.
सिईओ दिलीप स्वामी यांनी शिक्षण विभागास दिशा देणारे विविध १६ उपक्रम सांगून सायकल बॅंक, दशसुत्री कार्यक्रम, माझे मुल माझी जबाबदारी, यासह स्वच्छ सुंदर शाळा असा उपक्रमाचे सादरीकरण करून माहिती दिली. सर्व कर्मचारी यांनी चांगले काम करणेचे सुचना दिल्या. प्रारंभी आयुक्त मांडरे यांचे स्वागत सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी केले.