सोलापूर शहरात पोदार इंग्लिश स्कूल शेजारी असलेल्या रामचंद्र आप्पा शेटे विहार येते स्प्राऊटींग किड्स नर्सरी प्री प्रायमरी स्कूलचा शुभारंभ येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, क्रेडो या संस्थेच्या आश्लेषा दिवेकर, श्रेयश एरंडोल आदींच्या हस्ते करण्यात आला. शंकर ढोले यांच्या पत्नी अश्विनी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्प्राउटिंग किड्स प्री नर्सरी स्कूलची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी क्रेडो या संस्थेने आकर्षक अशी मुलांना खेळण्यासाठी विशेष लॅब दिली आहे. उपस्थित पाहुण्यांनी या स्कूलचे आणि विविध सुविधा तसेच परिसराचे भरभरून कौतुक केले. यावेळी प्रताप सूर्यवंशी, पानगावकर सर, प्रियंका आराध्ये, श्रद्धा शिंदे, योगिता जाधव, डॉक्टर पूजा शिंदे, श्रीकांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भोजरंगे, रामचंद्र ढोले, शहाजी ढोले, महेश ढोले यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.





