आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर : विजापूर रोडवरील सोहम प्लाझा सैफुल येथे महेश देवकर मित्रपरिवार व लायन्स क्लब ऑफव इको नेचर क्ल्बच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचा परिसरातील 578 महिला, पुरुषांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने नेत्ररोग, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, दंत रोग तपासणी व आरोग्य तपासणी यासह विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, युवा नेते मनिष देशमुख, शहर संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, शहर सरचिटणीस शशी थोरात, उपमहापौर राजेश काळे, हेमंत पिंगळे, डॉ. शिवराज सरतापे, अमोल गायकवाड, राम वाकसे, विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, संदीप जाधव, समर्थ बंडे, अक्षय अंजिखाने, मधुसुदन जंगम, श्रीनिवास बुरुडकर, परमेश्वर माळगे, संपदा जोशी, निलिमा शितोळे, सरोजनी टिपे, अनुराधा खारे, कुंभार मामा, सागर शिंदे, कपील आलाट, मसुती काका आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रमेश देशपती, डॉ. प्रतिमा शिंदे, डॉ. अविनाश शिंदे व डॉ. अश्विनी वांगीकर यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले.शिबिरासाठी वैजुनाथ कदम, मनोज देवकर, बसवराज व्हनगुंडे, सिद्धेश्वर अडगळे, विशाल पाटील, नवगिरे, हवीनाळ, संजय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. बाळू कलखेंबकर, तानाजी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. महेश देवकर यांनी आभार मानले.