सोलापूर : शिक्षक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिके अंतर्गत मदर तेरेसा पॉलिक्लिनिक येथे शिक्षकांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर शहरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांवर त्यांच्या कुटूंबियांना लसीकरण देण्यात आले. हे लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तक्षशिला मिलिंद शिरसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी विजय परीट, चिदंबर शहापुरे, प्रीतम प्रक्षाळे, राजेश भोई यांच्या सहकार्याने लसीकरण सत्र पार पडले.