शिवाजी सुरवसे / सोलापूर : आज जागतिक लोकसंख्या दिन. त्यामुळे जगाची देशाची महाराष्ट्राची आणि आपल्या सोलापूरची लोकसंख्या किती हे जाणून घेण्याचा Yes न्यूज मराठी चा विशेष रिपोर्ट.
आजच्या घडीला जगाची लोकसंख्या 788 कोटी आहे. जगाच्या तुलनेत चीन पाठोपाठ भारत लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची लोकसंख्या 139 कोटी वर पोहोचली असून महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 42 लाख वर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर शहराची लोकसंख्या नऊ लाख 51 हजार होती तर जिल्ह्याची लोकसंख्या 43 लाख दोन हजार आहे. दर दहा वर्षांनी होणारी जनगणना यावर्षी 2021 ची जनगणना कोरोनाच्या संकटामुळे झाली नाही. आधार कार्ड च्या नोंदणी नुसार 2020 ला सोलापूर शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाख 20 हजार एवढी झाली आहे. यामध्ये 29 लाख नागरिक शिक्षित आहेत .19 लाख मजूर हे स्किल वर्कर आहेत. सहा लाख नागरिक शेतीवर अवलंबून आहेत .तर पाच लाख शेतमजूर आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. 1981 साली सोलापूर शहराची पाच लाख 18 हजार होती.1991 च्या जनगणनेनुसार 6 लाख 27 हजार तर 2001 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या आठ लाख 75 हजार झाली. 2011साली ही लोकसंख्या नऊ लाख 54 हजार वर पोहोचली.
आधार कार्ड च्या नोंदीनुसार 2021 शहराची लोकसंख्या दहा लाख 41 हजार वर पोहोचली आहे. दर दहा वर्षानंतर सोलापूर शहराची लोकसंख्या अवघी एक ते दीड लाख देखील वाढत नाही. ही चिंताजनक बाब आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनातील अधिकारी याचा विचार करणे गरजेचे आहे. एकीकडं सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून चर्चेत आहे शिवाय देशाच्या राहण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये सोलापूर शहर आले आहे असे असताना शहरातील लोकसंख्या का वाढत नाही तसेच सोलापूर शहरातून पुण्या-मुंबईकडे आणि मेट्रो सिटी कडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे याचादेखील शहरातील आमदारांनी आणि नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे.