थायलंड येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय कटपुतली महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोलापूरचा बाल कलाकार सोहम येमूलची निवड करण्यात आली. विविध आठ देशातील कलाकारांना या हार्मनी पपेट फेस्टिव्हल मध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. या महोत्सवात जपान, नेपाळ, कोलंबिया, फिलिपिन्स, भारत, युनायटेड किंगडम , पेरू आणि थायलंड देशातील कलाकार सादरीकरण करणार आहेत. थायलंड येथील उनिमा थायलंड, सेमाथाई मॅरिनियेट फौंडेशन – आर्टस् फॉर सोशल, सिखीओ कोरट इंटरनॅशनल पपेट फेस्टिव्हल आणि सी-खीओ कोरट या चार संस्था एकत्रितपणे महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. 28,29 आणि 30 नोव्हेंबर असे तीन दिवस पपेट महोत्सव चालणार आहे. कार्यक्रमास विविध देशातील कलावंत, प्रेक्षक आणि स्थानिक नागरिक उपस्थित असणार आहेत. महोत्सवात काही पपेट ग्रुप कडून पपेट्स विक्री सुद्धा होणार आहे. त्याकरिता विशेष प्रदर्शन व विक्री स्टॉलची व्यवस्था असणार आहे. बँकॉक पासून सुमारे 210 किमी अंतरावर असणाऱ्या सिखाऊ जिल्ह्यात , नखॉन रॅचेतसीमा या गावात पपेट महोत्सव होणार आहे. सोलापूरचा चि सोहम शाम येमूल आणि त्याचे पालक सोनाली आणि शाम या पपेट महोत्सवात “कटपुतलीतून गीत रामायण” सादर करणार आहेत.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी गजानन माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कटपुतलीतून सादरीकरण होणार आहे. गीत रामायणाचे हिंदी आवृत्ती कुमूदाग्रज यांनी भाषांतर केले असून वसंत आजगावकर यांनी गायली आहेत. या बाहुली नाट्यात प्रभू राम, लक्ष्मण , सीता, हनुमान आणि रावण यांचे कटपुतली बाहुल्या असून इतर काही कटआऊटस आहेत. हि सर्व विशेष कटपुतली सोहमची आई सोनाली आणि वडील शाम यांनी बनविली आहेत. अश्या प्रकारचे ओठ न हलणारी कटपुतली बाहुल्या पहिल्यांदाच भारतात सादरीकरण केल्या जात आहेत. सोहमचे काका जयंत यांनी या बाहुली नाट्यासाठी वापरली जाणारी विशेष स्टेज तयार केले आहे .
थायलंड मधील या संधी सोबतच सोहम मॅजिक पपेट थिएटर यांना आणखीन एक निमंत्रण मिळाले आहे. विश्व हिंदू परिषद थायलंड यांच्या कडूनही कटपुतलीतून गीत रामायण कार्यक्रम सादर करण्याचे निमंत्रण मिळाले आहे. २७ नोव्हेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
थायलंड आणि भारत या देशातील सांस्कृतिक बंध फार पुरातन काळातील आहेत. थायलंड मध्ये रामायणाची वेगळी आवृत्ती पाहावयास मिळते, ती म्हणजे रामकियन.वाल्मिकी रामायण आणि थायलंडच्या रामकियन मध्ये बरेच साम्य आहे. थायलंडचे सध्याचे महामहिम राजा महा वजिरालॉन्गकोर्न “राम दहावे” – चक्री साम्राज्याचे ते दहावे राजा आहेत.
सोहम वयाच्या पाच वर्षांपासून बोलक्या बाहुल्या आणि कटपुतलीचे खेळ सादर करतो. जेष्टय कलावंत रामदास पाध्ये यांचे व्हिडीओ पाहून त्याने हि कला शिकली. नंतर त्यांच्या वडिलांनी त्याच्यासाठी छोटू नावाचा बोलका बाहुला बनविला. सोहम सध्या ओठ न हलविता बोलण्याची कलेचा पुढचा टप्पा शिकत आहे. आणि ते म्हणजे ओठ न हलविता गाणं गायचे. सध्या त्याचे प्रशिक्षण रत्नागिरीचे जेष्टय कलावंत श्रीकांत ढालकर सर यांच्याकडून घेत आहे. सोहमने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये भारतातील सर्वात कमी वयाचा बोलका बाहुला आणि कटपुतली कलाकार असा विक्रम वयाच्या आठव्या वर्षी नोंद केले. इंडिया फाइट्स अगेन्स्ट कोव्हीड या त्याच्या बाहुल्यांच्या लघु चित्रपटास लंडन येथील नेव्हर सच इंनोसन्स आंतराष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जगभरातील 44 देशातील 4000 स्पर्धक भाग घेतले होते.
अलीकडेच सोहमने बेंगळुरू येथील धातू आंतराष्ट्रीय पपेट फेस्टिव्हल येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत मावळा नोककू विद्या कला सादर केली. सोहमने आता पर्यंत 63 हुन अधिक कार्यक्रम केले तसेच इतर मुलांना या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी दोन कार्यशाळा घेतल्या. सोहम इयत्ता नववीत बी. एफ. दमाणी प्रशाला सोलापूर येथे शिकत आहे. इयत्ता पहिली ते चौथी च्या त्याच्या शाळा आणि शाळा बाह्य सर्व कामगिरीवर 2021 सालात “दमाणी भूषण” आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला.

