सोलापूर – पुणे – सोलापूर धावणार इलेक्ट्रिक बस ! चार चार्जिंग स्पॉट.
अमोल साबळे / सोलापूर : राज्यपरिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात लवकरच दहा इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. यासाठी डिपार्टमेंटल वर्कशॉपमध्ये चार चार्जिंग पॉइंट होणार असल्याची माहिती राज्यपरिवहन महामंडळाच्या प्रशासनाने दिली आहे.
इंधनाचे वाढते दर पाहता राज्य परिवहन महामंडळाने राज्यात १०० इलेक्ट्रिक बसेस आणल्या आहेत. या पैकी सोलापूर ते पुणे आणि पुणे ते सोलापूर साठी प्रत्येकी ५ बसेस मिळाल्या आहेत. त्याच प्रमाणे सोलापूर -विजयपूर सोलापूर या महामार्गावर या बसेस मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सोलापूरमधील डिपार्टमेंटल वर्कशॉप मध्ये वॉशिंग रॅम येथे चार चार्जिंग पॉईंट असतील.
ठळक वैशिष्ट्ये
या चार्जिंग पॉईंटची ११० केव्ही पॉवर सप्लाय ची क्षमता असणार आहे. ९० किलो वॅट व १५० किलो वॅट असे दोन चार्जिंग पॉईंट असणार आहेत. बसची बॅटरी चार्ज होण्यासाठी ९० किलो वॅट ने तीन तासाचा अवधी आणि १५० किलो वॅट ने एक तासाचा अवधी लागणार आहे.
- इलेक्ट्रिक बसची बॅटरीची बॅटरी हि ३०० किलो वॅट ची असेल
- १५० किलो वॅट चे दोन चार्जिंग पॉईंट
- ९० किलो वॅट चे दोन चार्जिंग पॉईंट
- एका चार्जिंग मध्ये ३०० किलोमीटर बस धावू शकेल
*१० ते १२ प्रस्तावित चार्जिंग पॉईंट
- रघुनाथ कांबळे
सरव्यवस्थापक राज्यपरिवहन महामंडळ मुंबई