सोलापूर : सोलापूर शहरात जिकडे तिकडे चोहीकडे खोदकाम सुरू आहे . शहराला जणूकाही खोदकाम योजना मंजूर झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे त्यामुळे खड्डे चुकवित वाहनचालकांना गाडी चालवावी लागत आहे. याचा त्रास कमी म्हणून की काय अनेक ठिकाणी खोदकामामुळे ड्रेनेजच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या लाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत आहे महिनोनमहिने काही रस्ते उघडून ठेवले आहेत मात्र ते केले जात नसल्यामुळे धुळीचे साम्राज्य वाढले आहे. शहरातील धुळीचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे.शहरातील खोदलेले रस्ते . यावर वाहणारे पाणी आणि हवेतील धूळ यामुळे सोलापूरकर चांगलेच त्रस्त झाले आहेत .कोणते काम कोणत्या योजनेतून सुरू आहे याचा थांगपत्ता नगरसेवकांना देखील नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काय.. नवीपेठ, चौपाड, दत्त चौक, माणिक चौक, लकी चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक या शहराच्या मध्यवर्ती भागात नजर टाकल्यानंतर खरंच धूळ खड्डे आणि रस्त्यावरच पाणी या प्रमुख समस्या जाणवतात.