सोलापूरकरांसाठी मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. लवकरच सोलापूरला आणखी एक महिला खासदार मिळणार आहे.राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून सोलापूरच्या ज्योती वाघमारे यांचे नाव राज्यसभेसाठी निश्चित करण्यात आले आहे.ज्योती वाघमारे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यामुळे सोलापूरला आणखी एक महिला खासदार मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिवसेनेकडून राज्यसभेसाठी Rahul Shewale, Rohit Tilak आणि Shaina NC या नावांवरही जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांची नावे आघाडीवर असल्याचे मानले जात होते.

