सोलापूर शहर युवक काँग्रेसचा उपक्रम
आज भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या 106 व्या जयंती निमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे” इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड-2023 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव योगिनी घारे यांना सोलापूर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे,संयोजक युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सचिव गजानन बिरादार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केले. शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे,काँग्रेस प्रवक्ते अशोक निंबर्गी,महाराष्ट्र युवक प्रदेश सचिव गजानन बिरादार यांचे मनोगत झाले.
सत्काराला उत्तर देताना सोलापूर विद्यापीठ कुलसचिव योगिनी घारे म्हणाले ज्या विद्यापीठांमध्ये मी कुलसचिव म्हणून काम करत आहे ते विद्यापीठ सोलापूर सुपुत्र सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणली व आज इंदिराजींच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे इंदिरा प्रियदर्शनी अवॉर्ड देऊन माझा सत्कार करत आहात हे माझे खूप मोठे भाग्य आहे. पन्नास वर्षांपूर्वी एका महिलेस महिला पंतप्रधान मिळणे खूप अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती त्या मिळालेल्या संधीचे सोने इंदिराजी यांनी केले. आमच्यासारख्या महिलांसाठी खूप मोठ्या आदर्श आहेत.. नसबंदी सारखी योजना त्यावेळेस भारतामध्ये आणले. त्यावेळेस देशांमध्ये खूप विरोध होता पण इंदिराजींनी तो उपक्रम ठामपणे मार्गी लावला. आज आम्हास ५० वर्षाचा त्या उपक्रमाचे महत्त्व कळत आहेत ते आज किती गरजेचे आहे इंदिराजी त्यावेळेस म्हणाले होते लोकसंख्या वाढले की आपला देश प्रगतीकडे जाणार नाही तर अधोगतीकडे जाईल. इंदिराजी एक दूरदृष्टी ठेवणाऱ्या नेत्या होत्या. बँकांचे राष्ट्रीयीकरण असे विविध उपक्रम त्यांनी देशात राबवून यशस्वी केले. इंदिराजी प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात आज मला आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यामध्ये इंदिरा दिसत आहे.भविष्यात सोलापुरात आमदार प्रणितीताई शिंदे हेच सोलापूरचा विकास करतील असा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे,प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे,अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी,युवक काँग्रेस प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, प्रवीण जाधव,उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष युवक महेश जोकारे,माजी परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला,गणेश साळुंखे,एन एस यु आय अध्यक्ष नागेश म्याकल, सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी,सुशीलकुमार म्हेत्रे, महेंद्र शिंदे,धीरज खंदारे,शरद गुमटे,मनोहर चकोलेकर,शुभम माने,ईलियास शेख,शशिकांत शेळके,प्रतीक शिंगे, आशुतोष वाले आदित्य म्हमाणे,अजय सुगरे,जितू वाडेकर,यासार सय्यद, अजिंक्य पाटील,संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, श्रीशैल रणखांबे, योगेश मार्गम, संदेश कांबळे,अविनाश मोरे, चंद्रकांत नाईक, दिनेश डोंगरे, नासिर शेख,उमर बेन्नोशीरुर, श्याम केंगार,अक्षय दिल्लीवाले,वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, प्रवक्ते वशिष्ठ सोनकांबळे, पशुपती माशाळ, प्रकाश गेंटयाल, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव,अॕड.करीमुनिसा बागवान, विणा देवकते, शोभा बोबे, भारती इपलपल्ली,रेखा बिनेकर,अंजली मांगोडेकर,लखन गायकवाड,शिवशंकर अंजनाळकर,नूरअहमद नालवार, हरूण शेख, लखन गायकवाड, मोहसीन फुलारी,आनंद तवटी, मेघश्याम गौड़ा,श्रीकांत दासरी,प्रा.भोजराज पवार,जब्बार शेख,हनुमंत रुपनर,शोऐब कडेचुर,नागनाथ शावणे,चंदा काळे,मुमताज शेख, विजयलक्ष्मी झाकणे,अनिता भालेराव,अभिलाष अच्युगटला, करीम शेख शुकुर शेख हाजी महेमुद शेख आदी उपस्थित होते