सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कै.पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील मा.महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कै.पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, आणि वारद यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत जयंतीचा कार्यक्रम झाला.यावेळी माजी कुलगुरू इरेश स्वामी, महिंद्र वारद,मल्लिकार्जुन कावळे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, सुर्वणा मिरजकर, शोभा बोल्ली,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे,मल्लीनाथ शहाबादे,विश्व्नाथ साबळे, शिवाजी सुरवसे,सुभाष पाटील, मृगद्रे पाटील, वेदतां पाटील,
आदी मान्यवर उपस्थित होते.