दोन दिवस चालणार महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री
सोलापूर मनपा महिला कर्मचारी आयोजित विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम
सोलापूर — जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून , मा. आयुक्त डॉ. सचिन ओंम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त तैमुर मुलाणी यांच्या नियंत्रण खाली सोलापूर महानगर पालिका, महिला बालकल्याण विभाग व दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आयोजित महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाल बाजारपेठ मिळावी, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने दिनांक 17 व 18 मार्च 2025 या दोन दिवसीय वस्तु व खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शन तसेच सोलापूर मनपा महिला कर्मचाऱ्यासाठी सुदंर हस्ताअक्षर, निबंध,परंपरिक वेशभुषा,समहू गायन, ग्रुपडान्स रस्सीकेच,काव्या वाचन, पाककला इत्यादी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका , इंद्र भवन परिसर, पार्क चौक, सोलापूर येथे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये ड्रेस मटेरियल , साडी , लग्नातील रुकवत साहित्य , कडक भाकरी,शेंगा चटणी,,शेंगा पोळी, जवस,कारळ,शेंगा,शेंगा पोळी, धपाटे , सर्व प्रकारचे पापड विक्री, मसाले , तिखट मसाले,खाद्यपदार्थ,हर्बल तेल, झाडू, खराटा, मूर्ती विक्री, कॉस्मेटिक साहित्य , वडा पाव,पाणी पुरी, चायनीज पदार्थ, फ्रुट धपाटे कॉकटेल पेय, मसाले उन्हाळी काम , बिस्कीट,अगरबत्ती,धूप,ज्यूस, गुळ पावडर पुरण प्रीमिक्स नाचणी ज्वारी बिस्कीट हेल्थ ड्रिंक पावडर, हातानी बनवलेले व आरोग्यदायी ताजे, स्वच्छ व चविष्ट खाद्य पदार्थ, सुगंधी वस्तु अगरबत्ती, विविध प्रकारचे मसाले, चटणी व पापड , इतर ही खाद्यपदार्थ, घरगुती साहित्य, दररोज वापरातील स्वच्छता करिता लागणारे केमिकल साहित्य आदी शहरी महिलानी तयार केलेले वस्तूची विक्री प्रदर्शना मध्ये होणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता माननिय आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी. असे आवाहन उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी तैमुर मुलाणी , सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना केले आहे . प्रदर्शन ठिकाणी विविध शासकीय योजना बद्दल माहिती देण्यात येणार आहे महिला व बाल कल्याण विभागातील योजना , दिव्यांग कल्याण विभाग, समाजविकास विभागातील सर्व योजना , पी एम स्वनिधी योजने अंतर्गत स्वनिधी से समृद्धी योजने अंतर्गत ८ योजनाचा लाभ देणे ,तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत योजनेचे लाभा बाबत माहिती ,पंतप्रधान आवास योजना आदी योजने बाबत अधिकारी हे २ दिवस माहिती देणार आहेत.