सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा
सोलापूर – दीनदयाळ अंत्योदया योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी “हर घर तिरंगा” मोहिमेच्या अनुषंगाने तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.



महानगरपालिका सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये शहरातील ३० पेक्षा जास्त बचत गटांमधील सुमारे ७५ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी बचत गटातील सक्रीय सदस्यांनी उपस्थित महिलांना तिरंगा राखी बनविण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाने सुरू केलेली ‘हर घर तिरंगा’ मोहीम ही नागरिकांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे आणि तिरंग्याशी वैयक्तिक नाते जोडणे या उद्देशाने राबवली जाते. महाराष्ट्र राज्याने या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली असून सन २०२५ मध्येही ही मोहीम दि. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत तीन टप्प्यांमध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.



यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी उपस्थिती असलेल्या बचत गटाना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकुलवार, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी उपस्थितीत होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समुदाय संघटक, निता गवळी, सुनिता कोरे, ज्योती शिर्कुल, ज्योती चौगुले, आशिया शेख, तब्बसुम बडेघर वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यांनी यशासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला वाघमारे यांनी केले, तर आभारप्रदर्शन गणेश हजारे यांनी मानले.

