सोलापूर : वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनस्तरावरून राज्यभरातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते मागील आठ महिन्यापासून बंद असलेल्या शाळा महाविद्यालय सुरू करीत असताना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांने योग्य ती खबरदारी घेऊन शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.त्याअनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खाजगी शाळा आणि महाविद्यालया यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोमवारपासून शहर परिसरातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यात येतील त्यानंतर आवश्यकतेनुसार बाकीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागास देण्यात आलेले आहेत, शाळा सुरू करण्यापुर्वी शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करने , थर्मामीटर ऑक्सी मीटरच्या साह्याने प्रत्येक विद्यार्थ्यांची चाचणी करून घेणे , प्रत्येक वर्ग सॅनेटाझर करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,याशिवाय शिक्षकांची देखील कोरोनाची चाचणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.