नियोजनाचा अभाव.. स्मार्ट सिटीचे निघत आहे वाभाडे…
सोलापूर : शहरात स्मार्ट सिटी च्या नावाखाली अख्खे शहर आणि अत्यंत चांगले असलेले रस्ते खोदण्याचा सपाटाच सुरू केला आहे ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याची सुमारे पाचशे कोटी रुपयांची कामे दोनच ठेकेदाराकडे आहेत त्यामुळे सहा-सहा महिने रस्ते खोदले तरी ते वेळेवर दुरुस्त केले जात नाहीत यामुळे शहरवासीय प्रचंड हैराण झाले आहेत एकीकडं खड्ड्याचा सामना करायचा तर दुसरीकडं धुळीचे साम्राज्य यामुळे वाहनधारकांचा जीव मेटाकुटीस आला आहे . महापालिका आणि स्मार्ट सिटी चे अधिकारी यांच्यामध्ये मी शहाणा की तू शहाणा अशी स्पर्धा लागल्यामुळे शहरवासीय यात भरडले जात आहे.
याबाबत येस न्यूज मराठी ने पहिल्यापासूनच आवाज उठवला आहे. गरज नसणारी कामे करुन कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे . शहरातील नव्या पेठेत एक फुटाचा देखील रस्ता शिल्लक राहिला नाही .लकी चौक ..नवी पेठ… पारस इस्टेट… मोबाईल गल्ली.. दत्त चौक या परिसरात पाहिल्यानंतर खरंच आपण शहरात राहतो ही खेडेगावात असा प्रश्न पडतोय.. त्याच त्या ठिकाणी दर सहा महिन्यांनी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे दत्त चौक तर चारही बाजूनी खोदकाम माने बरबाद झाला आहे. भैय्या चौक रेल्वे स्टेशन सात रस्ता डी आर एम ऑफिस तसेच कन्ना चौक या ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणावर चांगले रस्ते कापण्याचा उद्योग सुरू आहे .येस न्यूज मराठी च्या वृत्ताची दखल घेऊन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि स्मार्ट सिटी चे सीईओ यांना समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या मात्र दोघे एकमेकांकडे बोट ठेवत आहेत यामध्ये मक्तेदार याचे भले होत असून टक्केवारी घेऊन कामे सुरू असल्यामुळे कामाचा दर्जा देखील चांगला दिसून येत नाही सर्वच नगरसेवक तर मूग गिळून गप्प आहेत त्यामुळे या शहराचे कसे होणार देव जाणे.