सोलापूर : डोणजच्या ए. एम. स्पोर्टस् क्लबने जिल्हा किशोर गट खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. कै. अंबिर मुलाणी यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ जि. प. प्रा. शाळा डोणज येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात ए. एम स्पोर्ट्स, डोणजने छत्रपती खो-खो क्लब मरवडे संघास हरविले.दीनबंधू मंद्रूप क्लबने तृतीय तर आदर्श खो-खो क्लब शेवतेने संघास चतुर्थ स्थान संपादिले.
विजयी संघाकड़ून डोणजच्या वैभव कोळी व रोहन आनंदपुरे यांनी उत्कृष्ठ संरक्षण केले. तसेच तुषार कोरे, विनायक स्वामी, रघुवीर मंटूर, चन्नवीर मंटूर, कट्टीमनी यांनी धारदार आक्रमणाचा करीत विजयश्री खेचून आणली. उपविजयी मरवडे संघाकडून समर्थ कुंभार व संकेत बावचे यांची लढत अपुरी पडली.
सोलापर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे निरीक्षक विजय दत्तू, कृष्णा कोळी, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, दामाजी शुगर चेअरमन शशिकांत बुगडे, स्वा. शे. सं तालुका अध्यक्ष श्रीमंत केदार, मा. ग्रा. पं. सदस्य रमेश केदार, दुर्योधन पुजारी, शिवानंद पुजारी, बसवराज आनंदपुरे, प्र. संघटना सरचिटणीस सागर पाटी, मेजर सोमलिंग पुजारी, संतोष मलगोंडे, विठ्ठल बगले यांनी विजेते संघाचे अभिनंदन केले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए. एम स्पोर्ट्सचे मार्गदर्शक तथा युटोपियन शुगर्सचे-स्टोअर अकौंटंट सुनिल पुजारी, संयोजक अनिल लिगाडे, आण्णाप्पा बिराजदार, रोहित लिगाडे, राहुल भोसले, अप्पू बाळगे, संदीप आनंदपुरे, सागर आनंदपुरे, अनिल कोळी, अविनाश कोळी, सागर बगले, आमसिध्द कोळी, अमोल केदार यांचेसह डोणज ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.