प्रभावी अंमलबजावणी करणार : सिईओ दिलीप स्वामी
सोलापूर : केंद्र शासनाने व्यसन मुक्ती साठी सोलापूर जिल्ह्याची निवड केली आहे. व्यसनमुक्त सोलापूर जिल्ह्यासाठी कृती आराखडा तयार केला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणेत येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासन व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेत आज केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील अधिकारी यांनी आज सिईओ दिलीप स्वामी यांची भेट घेऊन व्यसनमुक्त सोलापूर जिल्हा च्या नियोजन बाबत चर्चा केली. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक अनुष्का गुप्ता, ओरिसाचे राज्य समन्वयक अभिनव घोलप, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी राज्य समन्वयिका अनुष्का शर्मा यांचे स्वागत सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. या प्रंसगी अतिरिक्त सिईओ संदिप कोहिणकर यांची देखील भेट घेऊन केंद्र शासनाचे अधिकारी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
या प्रंसगी बोलताना सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सोलापूर महाराष्ट्रात नव्याने ५ जिल्ह्यांची व्यसन मुक्त जिल्हा करणे साठी निवड करणेत आली आहे. “व्यसनमुक्त ग्राम” या शिर्षा खाली सोलापूर जिल्ह्यात अभियान स्वरूपात ही मोहिम राबविणेत येणार आहे. प्रारंभी पाच व दहा हजार लोकसंख्येची ग्रामपंचायतीचा निवडून या गावात व्यापक स्वरूपात मोहिम हाती घेणेत येत आहेत. या मोहिमेसाठी ब्रॅन्ड अॅम्बेसिडर निवडणेची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्रात नव्याने सोलापूर, ठाणे, जळगांव, कोल्हापूर, गडचिरोली या चा जिल्ह्याची निवड केली आहे.
जिल्हा स्तरीय व्यसनमुक्त समिती असणार आहे. तालुका व गाव स्तरावर देखील समिती स्थापन करण्यात येणार आहे. नशेचे आहारी गेलेले तरूण व व्यसनी. व्यक्तीस परावृत्त करणे साठी मोहिम हाती घेणेत येणार आहे. त्याचे वर्तनात बदल करणे साठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करणेत येणार आहेत.
राज्यांत नशा मुक्ती साठी दहा जिल्हे – अनुष्का गुप्ता
………
महाराष्ट्रात नशा मुक्त अभियान अंतर्गत दहा जिल्हे आहेत. पुणे , नागपूर , मुंबई नाशिक, अहमदनगर या जिल्ह्याची या पुर्वी निवड करणेत आली आहे. या वर्षी नव्याने पाच जिल्हे निवडणूक आले असून या मध्ये सोलापूर जिल्ह्यांच्या समावेश आहे. महाविद्यालयीन युवकांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देणेत येणार असल्याचे राज्य समन्वयिका अनुष्का गुप्ता यांनी सांगितले.