स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ मध्ये सोलापूर जिल्हा देशात अग्रस्थानी ठेवा : सिईओ स्वामी

0
9

सोलापूर – स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ मध्ये सोलापूर जिल्हा देशात अग्रस्थानी ठेवा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ साठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, बी.आर.सी. व सी.आर.सी.व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ मध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा क्र- २ व हागणदारीमुक्त अधिक ओडीएफ प्लस या उपक्रमावर भर द्यावा.कामाचे मुल्यमापन व पडताळणी वेळेत पुर्ण करा असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची तांत्रिक व प्रशासकीय मानस्का वेळेत पुर्ण करा.दृष्यमान स्वच्छता या साठी कचरा मुक्त ग्राम अभियान प्रभावीपणे राबवा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.

त्यास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार – सिईओ स्वामी
केंद्र व राज्य शासन निधी देत आहेत. ग्रामपंचायतीने सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे , आराखडे तसेच अंदाजपत्रक करून घेणेची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची आहे.वेळेत कामे. वेळेत कामे न झाले सरपंच व ग्रामसेवक जबाबदार राहतील. स्वच्छ भारत मिशन मधून ७० टक्के १५ वा वित्त आयोग मधून ३० टक्के निधी आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. या साठी १०० गुण आहेत. घनकचरा व्यवस्थापन साठी १५० गुण व सांडपाणी व्यवस्थापन साठी १५० गुण तर मैला गाळ व्यवस्थापन साठी १०० गुण आहेत.१५ जुलै पर्यंत पडताळणी ची कामे पुर्ण करा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सादरीकरण केले.मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं./ पाणी व स्वच्छता) इशाधीन शेळकंदे , पंढरपूरचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोला गट विकास अधिकारी आनंद लोकरे ,मोहोळचे गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, माळशिरसचे विनायक गुळवे, बार्शीचे गट विकास अधिकारी माणिकराव बिचकुले ,उत्तरचे गट विकास अधिकारी महेश पाटील , मंगळवेढ्याचे गट विकास अधिकारी शिवाजीराव पाटील , कुर्डूवाडीचे गट विकास अधिकारी चिलवंत, आदी उपस्थित होते.जिल्हा कक्षमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे , घनकचरा व्यवस्थापन तज्ञ मुकूंद आकुडे , मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे , वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी ,अल्फिया बिराजदार,आनंद मोची ,शितल कडलासकर यांनी परिश्रम घेतले.