जबाबदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची चेतनभाऊ नरोटे यांची मागणी
सोलापूर – देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा सोलापूर शहर काँग्रेसतर्फे काँग्रेस भवन सोलापूर येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, “महाराष्ट्राचा गौरव असलेले मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हा भारतीय संविधान, लोकशाही आणि न्यायसंस्थेच्या मूलभूत मूल्यांवर थेट आघात आहे. सर्वोच्च न्यायालय हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर असून, त्या पवित्र दालनात न्यायमूर्तींवर हल्ला करण्याचा हा प्रकार देशाच्या न्यायिक इतिहासातील काळा दिवस मानला जावा.”

या घटनेत वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बुटफेक केली असून, त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत. अशा कृतीमुळे केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण न्यायसंस्था आणि लोकशाहीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सुप्रीम कोर्टासारख्या सर्वोच्च न्यायालयात अशी हिंसक कृती घडत असूनही योग्य फौजदारी कारवाई न झाल्यास, समाजात चुकीचा संदेश जातो की न्यायसंस्थेवर हल्ला करणे अपराधमुक्त राहू शकते,
मनुवादी विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या राकेश किशोरने केलेल्या या अमानवी कृतीबाबत आजही कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. उलट, मग्रुरीची भाषा वापरून त्याने लोकशाही, संविधान आणि न्यायसंस्था यांचा अपमान केला आहे. अशा विकृत विचारांनी समाज आणि राष्ट्र यांच्या मूलभूत मूल्यांना गंभीर तडा पोहोचवू शकतो. लोकशाहीत राहून लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा कठोर गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक आहे.
ही घटना स्पष्टपणे दाखवते की विरोधाचे चुकीचे स्वरूप देशात वाढत आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु न्यायसंस्थेवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा आहे. या प्रवृत्तीला आळा बसला नाही, तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेची मुळे हादरतील आणि नागरिकांमध्ये न्यायसंस्थेवरील विश्वास हरवला जाईल.
काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला असून, न्यायसंस्थेची प्रतिष्ठा, स्वायत्तता आणि गौरव अबाधित राखण्यासाठी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
निवेदनाद्वारे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी पुढील ठोस मागण्या केल्या आहेत :
१️⃣ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्याला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व संबंधितांवर देशद्रोहाचा आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा.
२️⃣ सर्वोच्च न्यायालय परिसरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेश द्यावेत.
३️⃣ घटनेचे पूर्ण तपास आणि न्यायालयीन कारवाईसाठी पोलीस यंत्रणेला त्वरित मार्गदर्शन केले जावे.
काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी प्रशासनाला विनंती केली की, या गंभीर घटनेची त्वरित दखल घेऊन वरील मागण्यांवर ठोस कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.
यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, मा. नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, नरसिंह आसादे, कार्याध्यक्ष हनुमंतु सायबोलु, व सुशील बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, प्रवक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंदपट्टे, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, केशव इंगळे, अनिल मस्के, शकील शेख, गिरीधर थोरात, दिनेश म्हेत्रे, लखन गायकवाड, अनिल जाधव, संजय गायकवाड, रमेश फुले, के. के. म्हेत्रे, सुभाष वाघमारे, नासिर खान, नूरअहमद नालवार, परशुराम सतारेवाले, सुशीलकुमार म्हेत्रे, राजेश झंपले, धीरज खंदारे, माजी महिला अध्यक्ष अँड करीमुन्नीसा बागवान, हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, भीमराव शिंदे, आप्पा सलगर, चंद्रकांत टिक्के, मोहसीन फुलारी, ज्योती गायकवाड, मुमताज तांबोळी, रेखा बिनेकर, चंदा काळे, मार्तां रावडे, धैर्यशील बाबरे, चंदू नाईक, श्रीनिवास परकीपडंला, सुनील डोळसे, सचिन सुरवसे, अभिलाष अच्युगटला, आदी पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.