सोलापूरच्या बँकिंग क्षेत्राला हादरा देणारी बातमी… 92 वर्षाची बँक ‘खल्लास’ !

0
34

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरच्या बँकिंग क्षेत्राला विशेषता सहकारी बँकिंगला हादरा देणारी बातमी आज आरबीआयच्या निर्णयामुळे पुढे आली आहे .गेल्या वर्षभरापासून ज्या बँकेवर प्रशासक नियुक्त केले होते अशा सोलापुरातील तब्बल 92 वर्ष जुन्या लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रिझर्व बँकेने गुरुवारी रद्द केला. गेल्या वर्षी म्हणजे जून 2021 साली आर्थिक डबघााईस आल्यामुळे लक्ष्मी बँकेवर आरबीआयने प्रशासक नियुक्त केले.

सुमारे 500 कोटीच्या ठेवी बँक अडचणीत आल्यामुळे ठेवीदारांनी काढून घेतल्या आणि 200 कोटींच्या ठेवी बँकेत पैसे नसल्यामुळे अडकून राहिल्या शेवटी विमा क्लेम मंजूर झाल्यामुळे या 200 कोटींच्या ठेवी देखील ठेवीदारांना परत मिळाल्या. या बँकेचे 200 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. सुमारे 300 कर्मचारी 19 शाखा आणि दहा प्राईम लोकेशनला या बँकेच्या प्रॉपर्टीज आहेत. ठेवीदारांचे पैसे परत दिले आहेत त्यामुळे बँकेची परिस्थिती सुधारत आहे अशी अनेकांची भावना होती आणि आता ही बँक दुसऱ्या कोणत्यातरी बँकेमध्ये विलीन होईल अशी आशा असतानाच गुरुवारी या बँकेचा बँकिंग परवानाच रिझर्व बँकेने रद्द करून टाकला. यामुळे बँकेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामकाजावर मोठा ठपका निर्माण झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता प्रशासकाची देखील नियुक्ती रद्द झाली असून आरबीआय ने राज्याच्या सहकार खात्याला आदेश देऊन या बँकेवर लिक्विडेटर नेमावा अशा सूचना केल्या आहेत. बँकांची सुमारे 200 कोटींची थकीत कर्जे वसूल करणे बँकांच्या प्रॉपर्टीं विकून ठेवीदारांचे पैसे दिल्यापोटी विमा कंपनीला पैसे परत करणे.. कर्मचाऱ्यांची देय रकमा देणे ही कामे आता लिक्विडेटर च्या माध्यमातून सुरू होतील त्यामुळे बँकेतील सर्व व्यवहार बंद झाले असून 92 वर्षांचा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा बँकेचा कालखंड आता इतिहास जमा झाला आहे. यामुळे सोलापूरच्या सहकार बँकिंग क्षेत्राला मोठा हादरा बसला असून प्रत्येकाने याचे आत्मपरीक्षण करणे आता गरजेचे बनले आहे