सोलापूर : दमानी शाळेजवळील बुधवार पेठेतील बालाजी निकेतन येथील श्रीमती सीमा माधव हेगडे यांच्या घरात घुसून दोन अनोळखी व्यक्तींनी ६०,००० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या फसवून चोरून नेल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. २७ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तुम्हाला बरकत येईल , असे सांगत दान करण्यास सांगितले. या इसमाने १०० रुपयाच्या नोटे मध्ये सीमा हेगडे यांच्या सोन्याच्या बांगड्या गुंडाळून ठेवत घरातील ड्रॉवरमध्ये ठेवल्याचे भासविले. मात्र हातचलाखी करून सोन्याच्या बांगड्या व शंभर रुपये लंपास केल्याचे हेगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दराडे अधिक तपास करीत आहेत.