सोलापूर शहरात चोऱ्या करणारी उत्तर प्रदेशातील टोळी जेरबंद, 80 हजारांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त
येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये घरफोडी चोरी दरोडे असे प्रकार वाढले आहेत. त्या अनुषंगाने गदे शाखेकडील पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्यांचा तातडीने शोध लावण्याचे आदेश दिले होते. उत्तर प्रदेश मधील रहिवासी असणारे काहीजण चोरीचे सोने विकण्यासाठी जुना एम्प्लॉयमेंट चौक परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत सत्येंद्र सुरेंद्रसिंह, कमलादेवी चौरसिया, खुशबू फूलचन्द्र पांडे , घीरनमती मोती पांडे , पप्पू उर्फ सुनील बबन प्रसाद वर्मा आणि गोपाल श्री गरीब राम गोंड या उत्तर प्रदेशातील सहा जणांना सोलापूर व उस्मानाबाद एसटी स्टँड परिसरातून अटक केली. त्यांच्याजवळील 29 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या हातातील बिलवर तसेच 30 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड ,साडे पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची लगड, तसेच 59 ग्रॅम सोने रोख रक्कम असा जवळपास 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर यांनी संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.