मुंबई – नुकत्याच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची मिटींग मुंबईत पार पडली. त्यात महाराष्ट्राचे महागायक विजेता मोहम्मद अयाज यांनी राष्ट्रीय सरचिटणीस खा. प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितममध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी खा. सुनील तटकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आरोग्य मंत्री राजेश टोपे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय महा सचिव मतीन कांबले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोहम्मद अयाज गेले अनेक वर्षापासून संगीत व सामाजिक क्षेत्राममध्ये भरीव काम करत आहेत. सोलापूर व देशाच्या नाव जगभरामध्ये लौकीक केला आहे. आयाज यांना देश विदेशाममध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अयाज सांगतात की, मी पक्षामध्ये राजकारण न करता एक समाजकारण करु इच्छितो, कारण सर्वप्रथम मी एक कलावंत आहे . मला सांस्कृतिक विभागमध्ये काम करण्याची रुची आहे. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन जे काही मला संधी देईल मी ते सोनं करुन दाखवेल. कलाकारांचे प्रश्न असो किंवा सामाजिक प्रश्न त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याचा प्रयत्न करेन, मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो की एक कलावंताचा पक्ष प्रवेश एवढ्या पक्षाच्या मोठ-मोठ्या दिग्गजांच्या उपस्थितीत झाला आणि तेही अनेक मंत्री महोदय उपस्थित होते, हे सर्व नक्कीच माझ्यावर व माझ्या कलेवर प्रेम दाखवले ही बाब माझ्यासाठीच नव्हे तर सोलापूरसाठी पण एक अभिमानाची बाब आहे.
मला विश्वास आहे माझे सर्व सोलापूरकर व महाराष्ट्राचे रसिक गण माझ्या पाठीशी उभे नक्कीच राहतील. मला समाजासाठी काही तरी चांगल काम करण्यासाठी चालना देतील अशी मला खात्री आहे,आज मी एक गायक कलावंत म्हणुन नावारुपास आलो , त्यात पत्रकार बंधु व संपूर्ण मीडिया ग्रुप यांचा सिहांचा वाटा आहे मला व माझ्या कलेस जगभरात पोहोचवणारे पत्रकार बंधुचा मी सदैव ऋणी आहे. आशी प्रतिक्रीया मोहम्मद अयाज यांनी दिली.
