येस न्युज मराठी नेटवर्क : उन्हाळा असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्यानंतर विजापूर रस्त्यावरील सोन्या नगर येथील शरणकुमार कनकी यांच्या घरातील ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. यामध्ये सॅमसंग कंपनीचा मोबाइल , टीव्ही मिक्सर, तांब्याचा हंडा अशा वस्तू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक माडे अधिक तपास करीत आहेत.