सिंगापूर येथे दि. ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या सिंगापूर नॅशनल डाइविंग चैम्पियनशिप २०२४ मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना स्विमिंग मधील डायव्हिंग या क्रीडा प्रकरात एकूण ३ पदके पटकाविले आहेत.
या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, इंडोनेशिया, सिंगापूर व मकाऊ चाइना या देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
श्रावणी ने या स्पर्धेत, सीनियर ओपन वुमनस गटात खेळताना डाइविंग १ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये ब्राँझ मेडल पटकावले असून, एज ग्रुप ए गटात खेळताना डाइविंग १ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये सिल्वर मेडल तर डाइविंग ३ मीटर स्प्रिंगबोर्ड मध्ये ही सिल्वर मेडल पटकावले आहे.
श्रावणीने आजवर डायव्हिंग क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण २ गोल्ड, ३ सिल्वर आणि २ ब्रांज मेडल्स मिळवले आहेत.
यासाठी तिला तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. या योगदानासाठी फिना रेफरी श्री. मयुर व्यास सर व जज्ज श्री.हिमांशू तिवारी सर, कोच व्यंकटेश रंगस्वामी यांनी श्रावणीचे भरपूर कौतुकासह अभिनंदन केले आहे.