सोलापूर : फिलिपिन्स येथे २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पार पडलेल्या ११ व्या डायव्हिंग एशियन एज ग्रुप इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताकडून खेळताना सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने हायबोर्ड मध्ये सहावे स्थान पटकावले आहे. यासाठी तिला फिना रेफरी मयुर व्यास सर, इंडिया कोच कुंजकिशोर मेलम सर तसेच तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.