वडाळा -श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचालित, माऊली महाविद्यालय वडाळा व पु. आ. हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रानमसले, ता. उ. सोलापूर येथे विशेष श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दिनांक 6-1-2023 ते 12-1-2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
- या शिबिराचे समारोप समारंभ दि.12-1-23 रोजी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबा साठे, संस्थेचे संचालक हरिभाऊ घाडगे,सरपंच मनोहर क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार सर, माजी उपसरपंच राज गरड, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हावळे, विशाल गरड, व इतर सर्व सदस्य, प्र. प्राचार्य डॉ. विकास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे जितेंद्र साठे म्हणाले कि, विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ग्राम स्वच्छतेमध्ये, गावाच्या सामाजिक विकासामध्ये विद्यार्थ्याचे योगदान मोलाचे असते. तसेच यावेळी हरिभाऊ घाडगे, रमेश सुतार, मनोहर क्षीरसागर, नंदकुमार गरड यांनी मनोगत व्यक्त केले.
- या शिबिरात गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, ब्रह्मा गायत्री मंदिर, महादेव मंदिर, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता करण्यात आली व गावात शोष खड्डे घेण्यात आले . तसेच दररोज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय हरवाळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. प्रतिभा बिरादार व शेवटी आभार प्रा. प्रमोद पाटील यांनी मानले.