सोलापूर – संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिरीष जगदाळे व वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांची निवड करण्यात आली.

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या सूचनेनुसार सोलापुरातील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक हॉटेल ऐश्वर्या येथे पार पडली या बैठकीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी शिवश्री शिरीष जगदाळे यांची निवड करण्यात आली तसेच वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश कदम यांच्या निवडीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताराम बाबर पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके नितेश बोराडे पवन कुमार पाटील संजय पारवे संजोग सुरतगवंकर नागेश घोरपडे मनीष बोराडे विवेक स्वामी लखन गायकवाड यशवंत लोंढे बसवराज आळंदी सागर शिंदे माऊली सुरवसे तुकाराम पाटील अजय मस्के विजय जतकर शुभम मल्लू भंडारी नितीन देवकते चंद्रशेखर कंटीकर शेखर चौगुले रमेश चव्हाण विजय बिल्ली गुरु नागेश बिराजदार रुपेश कुमार किरसावंळगी नागेश भुजबळ तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.