येस न्युज मराठी नेटवर्क ; शिवसेनेच्या 56 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सूचक शब्दात भाष्य करताना भाजपवर कडाडून हल्ला चढवला. मला उद्याच्या निवडणुकीची मला अजिबात चिंता नाही. शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही. कुणी काय कलाकाऱ्या केला हे कळालं असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. आईचं दूध विकणारा शिवसेनेत नको, असे बाळासाहेबांचे शब्द सांगत त्यांनी गद्दारी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला.
मुख्यमंत्र्यांनी आमदारांना संबोधित करताना शिवसेना स्थापनेवेळच्या अनेक आठवणींना उजाळा देत भाषणाला सुरुवात केली. माझा पक्षच हा पितृपक्ष असूनकारण माझ्या पित्याने स्थापन केल्याचे सांगत पितृपक्ष मानत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शिवसेना स्थापनेचा क्षण मनात आठवून गेला. शिवसेना स्थापनेवेळी माझे वय 6 होत. शिवसेना आजवर कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. पक्षासाठी वार झेलणाऱ्यांना विनम्र अभिवादन करत असल्याचे ते म्हणाले.