येस न्युज नेटवर्क : राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या 11 महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार.” असं मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट केलं आहे.