• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार

by Yes News Marathi
June 24, 2023
in मुख्य बातमी
0
विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत विठ्ठलभक्तांसाठी घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा सुरु होण्याच्या चार तास आधीच दर्शनाची रांग बंद करण्यात येत होती. त्यामुळे आलेल्या लाखो वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत असे. रांगेतील कालावधी चार तासांनी वाढल्यामुळे अनेकांचा खोळंबा व्हायचा आणि रांग वाढत जायची. परंतु ही गैरसोय टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजताच्या सुमारास महापूजेला येतात. जवळपास पहाटे पाच वाजेपर्यंत ही शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात पार पडतो.

आता मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत असतानाही विठुरायाचे मुखदर्शन सुरुच ठेवले जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री बैठकीत याबाबतची माहिती दिली आहे.

या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना देवाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचां दर्शन घेता यावं, यासाठी भाविक अनेक तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. त्याचवेळी व्हीआयपी मंडळी दर्शन घेण्यासाठी गर्दी करुन नंब लावतात. हे टाळण्यासाठी शिंदे सरकारने धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा सुरु असतानाही सामान्य भाविकांना मुखदर्शन सुरु ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Previous Post

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Next Post

रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

Next Post
रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

रकुल प्रीत सिंगने आता ताज्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group