• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिक्षण आयुक्त झेडपीच्या शिक्षण विभागात येताच शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली झोप

by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
शिक्षण आयुक्त झेडपीच्या शिक्षण विभागात येताच शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली झोप
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सोलापूर : राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. मंगळवेढा तालुक्यातील कार्यक्रम संपवून त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात फेरफटका मारत अचानकच फायलींची झाडाझडती घेतली. आयुक्त आल्याचे समजताच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली आणि फायली तपासताना कर्मचाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे चित्र दिसून आले.
  • मागील काही महिन्यांपासून तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत सापडल्याने तसेच शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांच्या चौकशा लागल्याने सोलापूर जिल्हा परिषदेचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. पुणे शिक्षण उपसंचालक विभागात सोलापूर म्हटले की थट्टा केली जात असल्याचं ऐकण्यास मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्त मांढरे हे सोलापुरात आहेत त्यांचे दुपारी पावणे चारच्या दरम्यान जिल्हा परिषदेत आगमन झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रभारी शिक्षण अधिकारी सुलभा वटारे व संजय जावीर यांनी स्वागत केले. त्यानंतर त्यांचा ताफा शिक्षण विभागाकडे वळाला.
  • सोबत उपसंचालक औदुंबर उकिरडे होते, माध्यमिक शिक्षण विभागात जाताच मांढरे यांनी उकिरडे यांना तात्काळ रजिस्टर चेक करा आणि त्यानुसार फायली चेक करा अशा सूचना दिल्या. त्यामुळे तर कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. यावेळी फाईल चेक करताना कामकाजात बऱ्याच त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. आता यावर आयुक्त मांढरे हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

सोलापूर । गड्डा यात्रेला विद्युत रोषणाईची झळाळी पहा हे नयनरम्य फोटो

Next Post

MPSC कडून मोठी घोषणा ; गट ‘ब’आणि ‘क’ साठी मेगा भरती

Next Post
MPSC कडून मोठी घोषणा ; गट ‘ब’आणि ‘क’ साठी मेगा भरती

MPSC कडून मोठी घोषणा ; गट 'ब'आणि 'क' साठी मेगा भरती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group