येस न्युज मराठी नेटवर्क : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड येथे निधन झाले आहे. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे.
क्रिकेटर शेन वॉर्न यांनी काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शेन वॉर्न यांनी युक्रेनच्या बाजूने एक संदेश दिला होता आणि रशियाच्या कारवाईला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
शेन वॉर्नची कारकीर्द
जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवले आहेत