सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने शांभवी कन्स्ट्रक्शन यांच्या सहकार्याने १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धा बुधवार दि.25 जून २०२५ रोजी पासून सुरू होणार आहे.
सामना फी भरण्याची तारीख 22 जून 5 वाजेपर्यंत आहे. Lot’s 22 जुन 5 वाजता क्रिकेट off मध्ये टाकले जातील.
या स्पर्धा ४० षटकाच्या असतील, तसेच या स्पर्धा बाद पध्दतीने खेळवण्यात येतील, या स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्म तारीख ०१-०९-२०११ पुढील पात्र असणार आहे, या स्पर्धेसाठी प्रवेश फी रु.५०००/- राहील, या सामन्यासाठी खेळाडू रजिस्टर केलेला असावा. व सोलापूर जिल्ह्यातल्याच खेळाडूंना या सामन्यामध्ये भाग घेता येईल. ज्या संघाना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्या संघांनी रंगम सर मो.क्र.९४२१०२७७८४ व शिवा अकलूजकर मो.क्र. ९८८१७८६५७८ यांचाशी संपर्क करावा.