हिरज रेशीम पार्क येथे सदिच्छा भेट
सोलापूर : तत्कालीन वस्रोद्योग मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून रेशीम पार्क मंजुरी करून उभे करण्यात आले आहे. या रेशीम केंद्रामुळे जिल्ह्यातील रेशीम शेतीमध्ये वाढ झाली आहे, रेशीम शेतीमुळे शेतकर्यांना आर्थिक फायदा होत असून जिल्ह्यात जास्त प्रमाणात रेशीम लागवड वाढत आहे, असे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील रेशीम पार्कला वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी सावकारे बोलत होते.

यावेळी आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थिती होते. हिरज येथे रेशीम कोष खरेदी विक्री या ठिकाणी सुरु केल्यास शेतकर्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होईल यामुळे शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल. रेशीम उत्पादक शेतकर्यांसाठी विविध अभ्यासवर्ग आयोजित करण्यात यावेत. या सर्व मागण्यावर मंत्रालय स्तरावर तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात येईल व त्या बैठकीत सविस्तर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यात येईल,असे ना. सावकारे म्हणाले. यावेळी उज्वला पळसकर प्रादेशिक उपायुक्त वस्रोद्योग, रेशीम अधिकारी विनीत पवार, तालुका अध्यक्ष राम जाधव, बालाजी पवार डॉ.थिटे यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.