सोलापूर – नुकतीच सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशन लि.सोलापूर ची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. असोसिएशनच्या पहिल्या मीटिंगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बँकाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी चे प्रतिनिधी संचालक म्हणून श्री दिनकर देशमुख यांना स्वीकृत करण्यात आले.
बॅंकींग क्षेत्रातील अभ्यासू आणि तज्ञ व्यक्तिमत्त्व व अल्पावधीत नावाजलेल्या श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक व विद्यानंद बँकेचे सीईओ, दिनकर देशमुख यांना बँकिंग क्षेत्रामध्ये 25 वर्षाचा अनुभव आहे. याचा विचार करून त्यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लुनावत, उपाध्यक्ष प्रकाश वाले, संचालक राजगोपाल मणीयार, दिपक मुनोत, किसन माळी, असोसिएशनचे सर्व संचालक व विद्यानंद बँकेचे चेअरमन सुधीर गांधी यांनी दिनकर देशमुख यांचे अभिनंदन केले.