सोलापूर – विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी निकोप वातावरण तयार करा. गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करा.सुसंस्कार पिढी तयार होण्यासाठी सर्व मुख्याध्यापक यांनी प्रयत्न करावे असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी व्यक्त केले. पंचायत समिती उत्तर सोलापूर यांच्या विद्यमाने माध्यमिक मुख्याध्यापक यांची सहविचार सभा एस. व्ही.सी.एस.संकुल येथे पार पडली. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी ,विस्तार अधिकारी बापूराव जमादार,एस.व्ही, सी.एस. प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे, सर्जेराव जाधव, तालुक्यातील केंद्रप्रमुख व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

यावेळी पुढे सचिन जगताप म्हणाले की या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून करावयाची कामाची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, समाजातील तळागाळातील मुलापर्यंत शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे कार्य मनापासून करावे.शाळांमध्ये विविध शालेय उपक्रम राबवावे .शिक्षक म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.मुलासाठी विविध क्रीडाचे आयोजन करा .प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती तयार करा. मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबद्दल प्रशिक्षण घ्यायला हवे, मादक पदार्थ सेवन टाळण्यासाठी प्रहरी पथक तयार करा.
ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्या.आदी विषयावरती मार्गदर्शन केले. या सविचार सभेत विविध शालेय विषयावरती गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी विस्तार अधिकारी बापूराव जमादार केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, चंद्रकांत वाघमारे, यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन केले.
या सहविचार सभेत आयुष मंत्रालय यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या 75 कोटी सूर्यनमस्कार यामध्ये एस.व्ही.सी.एस हायस्कूल व मल्लिकार्जुन प्रशाला यांच्या योगदानाबद्दल शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे व वैजीनाथ हत्तुरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापक उपस्थित होते.
सदर सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे विषय साधन व्यक्ती संतोष साळुंखे, पांडुरंग सुर्वे, विशेष शिक्षक बालाजी थिटे, दत्तात्रय शिंदे विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले