मुंबई : मुंबई पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा निर्णय घेतला असून शहरात आता वाहन चालकासह गाडीत बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला सीटबेल्ट लावणं अनिवार्य असणार आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर ज्यांच्या गाडीत सीटबेल्टची सोय नाही त्यांनी ती तातडीन करून घेण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. सीट बेल्टसंबंधित आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंतचा अवधील देण्यात आला आहे. त्यानंतर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.