• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, February 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

by Yes News Marathi
February 5, 2026
in इतर घडामोडी
0
सारथी तर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त विविध कार्यक्रम
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृतीच्या उद्देशाने कॅन्सर हॉस्पिटल भेट, मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप आणि शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सारथी युथ फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. समाजातील वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या पाहतात जनजागृतीची गरज लक्षात येते. सोलापूर शहरामध्ये युवकांमधील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाचे वाढते प्रमाण पाहता कॅन्सर जनजागृती अधिक होणे अत्यावश्यक बनले आहे. कॅन्सर आजाराची जनजागृती वाढल्यास व्यसनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते यासाठी सारथी युथ फाऊंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सारथी युथ फाऊंडेशन २०१३ पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे.कॅन्सर दिनाच्या निमित्ताने मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप याचे उद्घाटन कॅन्सर मुक्त झालेल्या सौ. निलावती डोळस यांच्या हस्ते करण्यात आले. सारथी युथ फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र विनायक नगर येथे सदर शिबिर आयोजित करण्यात येईल अशी माहिती‌ सारथी युथ फाऊंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे यांनी दिली.

कॅन्सर हॉस्पिटल भेट
मागील पाच वर्षांपासून सारथी युथ फाऊंडेशन दरवर्षी कॅन्सर दिनाच्या निमित्ताने कॅन्सर हॉस्पिटल भेटीचे आयोजन करते. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना या भेटीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. कॅन्सर आजाराची गंभीरता, कॅन्सर सोबत जीवन, कॅन्सरची उपचार पद्धती लक्षात घेऊन कॅन्सर पासून दूर राहण्यासाठी सदर भेटीचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी कॅन्सर हॉस्पिटल सोलापूर येथे भेटीच्या आयोजन करण्यात आले. भेट दिलेल्या सहभागीने स्वतःला कॅन्सर पासून दूर ठेवण्याचा आणि समाजामध्ये कॅन्सरची जनजागृती निर्माण करण्यासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला.


चित्रकला स्पर्धा आयोजन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू तंबाखूजन्य पदार्थातून होणाऱ्या कॅन्सरच्या आजाराची जनजागृती व्हावी या उद्देशाने सोलापूर शहरातील विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांना माहीत असलेले तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी चित्रांद्वारे सादरीकरण केले. या स्पर्धांसाठी वालचंद महाविद्यालयातील अर्थशास्त्र व समाजशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


मौखिक आरोग्य तपासणी शिबिर
सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे मौखिक आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप याच्या आयोजन करण्यात आले. यामध्ये सोलापूर शहरातील ४२ रुग्णांची डॉ. शिवकुमार वामणे यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सवयी असणारे, मौखिक आजारांची लक्षणे दिसणारे रुग्णांची तपासणी करून गरजेनुसार त्यांना औषधांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सोडु इच्छिणाऱ्यांसाठी मोफत समुपदेशन पुढे सारथी तर्फे करण्यात आले. एनएमआयएमएस मुंबई महाविद्यालयातील ऋषी बुरडे, प्रथमेश कोणदे, वालचंद महाविद्यालयातील समाजकार्य विभागाचे मुक्ता गायकवाड, समाजशास्त्र व अर्थशास्त्र विभागाचे महेश रेड्डी, योगेश हसरभावे, व्यंकटेश पंतुवाले, भोलेनाथ जाटब, गणेश पोतदार, तुषार रकम, नौमान कुरेशी, अमीनशाह मकानदार, प्रवीण बाराचारे सारथी युथ फाऊंडेशनचे स्वयंसेवक कांचन सुरवसे, स्नेहा यरगुंटला, लक्ष्मी शिगरकंटी, अजय इंगळे, अरमान शेख, कुमार लिगाडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

7 व 9 फेब्रुवारी रोजी मतदान – मतमोजणी दिवशी आठवडे बाजार बंद चे आदेश

Next Post

काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, नरोटेचा राजीनामा घ्या – चाकोते,.. नरोटे म्हणाले त्यांचे योगदान काय..!

Next Post
काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, नरोटेचा राजीनामा घ्या – चाकोते,.. नरोटे म्हणाले त्यांचे योगदान काय..!

काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर, नरोटेचा राजीनामा घ्या - चाकोते,.. नरोटे म्हणाले त्यांचे योगदान काय..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In