सांगली (सुधीर गोखले) – सांगली जिल्हा परिषदेची मुदत संपून तब्ब्ल १६ महिने झाले तर या ‘प्रशासक’ राज मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याने आणि त्यांच्या शासकीय वाहनांची चाकेही थांबून असल्याने मानधन आणि इतर भत्त्यांवरील खर्ची पडणारे कोटी रुपयांची बचतच झाली असल्याचे दिसून आले तर एक प्रकारे ‘प्रशासक’ राज प्रभावी ठरले आहे.
अद्यापही जिल्हा परिषदेच्या, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयानुसार कामकाज चालत आले आहे. एक प्रकारे हि जमेचीच बाजू ठरली आहे कारण अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती आदीसाठी महिन्याकाठी मानधनाची तरतूद असते तसेच भत्तेही दिले जातात मासिक तसेच सर्वसाधारण सभेसाठी विशेष मानधनही दिले जाते.
अध्यक्ष आणि सभापतींना चार चाकी साठी इंधन भत्तेही दिले जातात निवासस्थाने आणि शिपाई वर्गाची सोय असते तर जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या भागातील दौऱ्यासाठी महिन्याला ठराविक रक्कम मिळते. या सर्व खर्चाची तरतूद अंदाजपत्रकात केलेली असते. सध्या प्रशासक राज मुळें या सर्व तरतुदींना तूर्तास ब्रेक लागला आहे हि एक प्रकारे जमेची बाजू जिल्हा परिषदेसाठी ठरु शकते सोळा महिन्यातील बचत झालेले जवळपास एक कोटी रुपये हे विकासकामांसाठी उपयोगी पडू शकतील.